काजोलने दिल्या वाढदिवसाच्या 'गंभीर' शुभेच्छा
   दिनांक :02-Apr-2019
मुंबई,
प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण आज ५० वर्षांचा झाला असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. यावेळी अजय देवगणची पत्नी काजोल हिनेसुद्धा अजय देवगणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण काजोलने मात्र शुभेच्छा देताना अजय देवगणला गंभीर शुभेच्छा दिल्या आहेत.
अजय देवगण आणि काजोलच्या लग्नाला २०हून अधिक वर्ष झाली आहे. तेव्हा आपल्या प्रिय पतीला ट्विटरच्या माध्यमातून काजोलने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
 
 
 
वाढदिवसानिमित्त काजोलने अजयसोबतचा एक फोटोही शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये काजोल लिहिते,' माझ्या धाडसी, सह्रदय आणि गंभीर पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझं येणारं वर्षं आनंदी जाओ अशी गंभीर इच्छा मी व्यक्त करते आणि मी अत्यंत गंभीरपणे हेही सांगते की तू ५०व्या वर्षी अधिक सुंदर दिसायला लागल आहे. या फोटोसोबत काजोलने एक स्मायलीही शेअर केली आहे.