मलेशियन समुद्रात चक्रीवादळ
   दिनांक :02-Apr-2019
पेनांग,
मलेशियातील पेनांग आयलँडवरील तान्जुंग टोकोंगच्या समुद्रकिनाऱ्यावर चक्रीवादळामुळे भोवरा आल्याचं दिसलं. स्थानिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हे चक्रीवादळ कैद केलं.
 

 
 
दुपारी दीडच्या सुमारास आलेलं हे चक्रीवादळ जवळपास पाच मिनिटं तान्जुंग टोकोंग भागात फिरत होतं. सुदैवाने या वादळात जीवितहानी झालेली नाही. परंतु यामुळे अनेक इमारती आणि घरांचं छप्पर उडालं आहे, तसंच झाडंही कोसळल्याची माहिती पेनांग सिव्हील डिफेन्स फोर्सच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.