रिंकू राजगुरुच्या चित्रपटाचा टीझर लाँच
   दिनांक :02-Apr-2019
मुंबई,
'सैराट' चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरुचा आगामी चित्रपट 'कागर'चा टीझर लाँच झाला आहे. या चित्रपटात रिंकूसोबत अभिनेता शुभांकर तावडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

 
 
कागरच्या टीझरमधून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात रिंकूची भूमिका काय असेल, याबाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सैराटमधील आर्ची फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात लोकप्रिय झाली होती. त्यानंतर रिंकूनचे 'सैराट'च्या कन्नड व्हर्जनमध्ये भूमिका केली, मात्र मराठीतला हा तिचा दुसराच सिनेमा आहे.
कागर चित्रपटात शशांक शेंड्ये, भारती पाटील यांच्याही भूमिका आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मकरंद माने यांच्या खांद्यावर आहे. कागर येत्या 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. टीझर पाहता हा सैराटप्रमाणेच प्रेमकथा आणि राजकीय पार्श्वभूमी असलेला चित्रपट वाटतो.
 
रिंकूच्या 'कागर'साठी पाहावी लागणार वाट
हा सिनेमा 14 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर प्रदर्शित केला जाणार होता. मात्र रिंकूच्या बारावीच्या परीक्षेमुळे तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यातच 26 तारखेला 'मार्व्हल : अॅव्हेंजर एंडगेम' हा चित्रपटही प्रदर्शित होणार असल्यामुळे प्रेक्षकांनी प्रदर्शनाची तारीख बदलण्याची मागणी केली आहे.