तैमुरविषयी ‘हे’ आहे साराचं मत
   दिनांक :02-Apr-2019
इतक्या वर्षांमध्ये बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला जितकी लोकप्रियता मिळाली नसेल त्याच्या कैकपटीने त्याच्या दोन्ही मुलांना ती मिळत आहे. एकीकडे सैफ आणि करीनाचा मुलगा तैमुर अली खान हा समाजमाध्यमांचे एकमेव आकर्षण आहे. तर दुसरीकडे सैफची मुलगी सारा अली खान तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. तैमुर आणि सारा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असले तरी या दोघांचीही सतत तुलना केली जाते. मात्र दोघंही सावंत्र भावंड असले तरी त्यांच्यातील प्रेम सख्ख्या भावंडांपेक्षा कमी नाही. नुकतंच साराने तैमुरविषयी एक वक्तव्य केलं आहे. तिच्या या वक्तव्यावरुन सारा आणि तैमुरमधील प्रेम दिसून येत आहे.
 
 
काही दिवसांपूर्वी वोग मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये साराने तैमुरविषयी तिच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना तैमुर म्हणजे आनंदाचा खजिना असल्याचं तिने म्हटलं आहे. “आज प्रत्येक जण तैमुरचा चाहता आहे. आमच्या घरीदेखील तो सगळ्यांचा लाडका आहे. प्रत्यक्षात पाहायला गेलं तर आमची फारशी भेट होत नाही. मात्र जेव्हा भेट होते तेव्हाचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास असतो. मी मनापासून सांगते, तैमुर म्हणजे आनंदाचा खजिना आहे. ज्यावेळी तैमुर आनंदी असतो, त्यावेळी आमचं सारं घर आनंदात असतं. माझ्या वडिलांचा तो आनंदाचा एकमेव स्त्रोत आहे”, असं सारा म्हणाली. सारा सध्या तिच्या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त आहे. ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी सारा लवकरच इम्तियाज अलीच्या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन तिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.