राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास देशाचे कार्टून नेटवर्क होईल- आदित्य ठाकरे
   दिनांक :20-Apr-2019
मुंबई: राहुल गांधी जर, देशाचे पंतप्रधान झाले तर देशाचे काय होईल? आपला देश कुठे जाईल? देशाचे कार्टून नेटवर्क होईल! या शब्दात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची खिल्ली उडवली आहे.
शिर्डीतील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी आयोजित सभेत आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींवर निशाणा साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, देशात पंतप्रधानपदासाठी मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही. मी तुम्हाला विचारतो देशाचे पंतप्रधान कोण... सांगा कोण... मोदींशिवाय आहे का दुसरा पर्याय? विरोधकांकडे तर दुसरे नावही नाही, असे म्हणत आदित्य यांनी भाषणात वडील उद्धव ठाकरेंच्या शैलीचे अनुकरण केले.