आजचे राशी भविष्य, दि. २१ एप्रिल २०१९
   दिनांक :20-Apr-2019
 
 

मेष - अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. स्वत:ची इमेज सुधारण्याची संधी मिळेल. विचार केलेली कामं पूर्ण होतील. दिवस उत्साही तसेच मनोरंजनात्मक राहील. कुटुंबातील अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. 

वृषभ - कामात व्यस्त राहाल. कार्यक्षेत्रात सन्मान मिळेल. मेहनतीने धनलाभ होईल. गेल्या काही दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामं होतील. दिवस चांगला आहे. अनेक कामात सक्रिय राहाल. पुढे जाण्यासाठी जीवनात काही बदल करावे लागू शकतात. अविवाहितांना जोडीदारासोबत चांगला वेळ मिळेल. प्रवासाचा योग आहे.

मिथुन - घाईत कोणतेही काम करु नका. पैशांबाबत चिंता राहील. वायफळ खर्च होऊ शकतो. नोकरी, व्यवसायात काही गोष्टींमुळे समस्या वाढू शकतात. पैशांच्या बाबतीत सावध राहा. तब्येतीबाबत हलगर्जीपणा करु नका. ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण राहील. पोटाची दुखणी होण्याची शक्यता आहे.

कर्क - नोकरीत समस्या येऊ शकतात. दररोजच्या कामात अडथळे येऊ शकतात. जिद्द कराल तर वाद होण्याची शक्यता आहे. विचार करण्यात अधिक वेळ घालवू नका. समस्या वाढू शकतात. तब्येतीत चढ-उतार होण्याची शक्यता आहे. झोप कमी राहील. डोकेदुखी आणि डोळ्यांना जळजळ होऊ शकते.

सिंह - कुटंबात शांती-सुख राहील. सामाजिक कामात सन्मान मिळेल. चांगल्या मित्राशी भेट होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची साथ मिळेल. जुन्या आजारांपासून आराम मिळेल.

कन्या - व्यवसायात वाढ होईल. कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळेल. समस्या संपण्याची शक्यता आहे. फायदा होईल. थकवा जाणवेल. आराम करा अन्यथा तब्येतीच्या समस्या वाढतील. खास लोकांशी भेट होऊ शकते.

तुळ - नोकरी, व्यवसायात लाभ होईल. दिवस चांगला आहे. अधिक फायदा होण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. स्वत:च्या फायद्याचा विचार करा. दुसऱ्यांना नाराज न करता हुशारीने काम करा. जोडीदारावर खर्च होऊ शकतो. जोडीदाराशी वाद करु नका. नशिबाच्या साथीने तुमची कामं पूर्ण होतील.

वृश्चिक - व्यवसायात मंदी राहील. बदली होण्याची शक्यता आहे. कोणतंही नवं काम सुरू करु नका. वायफळ कामांत मन अधिक राहील. अविवाहितांच्या प्रेमसंबंधांमध्ये तणाव राहील. 

धनु - दररोजची कामं पूर्ण होतील. विचार करुन मगच निर्णय घ्या. कुटंब, समाजात तुमचं महत्त्व वाढेल. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. जोडीदारासोबत दिवस चांगला जाईल. तब्येतीची काळजी घ्या. जेवणात मसालेदार पदार्थ खाऊ नका.

मकर - नवीन कामाची सुरुवात करु नका. दिवसाची सुरुवात खास नसेल. पैसे खर्च होतील. तुमच्या योजना गुप्त ठेवा. कोणाशीही शेअर करु नका. वाद होऊ शकतात. डोके आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

कुंभ - आर्थिक तंगी कमी होईल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची मदत मिळेल. कामात वेळ जाईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. चांगल्या लोकांच्या संगतीचा फायदा होईल. मुलांकडून चांगली बातमी येण्याची शक्यता आहे.

मीन - जसं काम चालू आहे तसंच चालू ठेवा. महागड्या वस्तूची खरेदी होऊ शकते. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. पैसे विचार करुन खर्च करा. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. थकवा आणि झोप न झाल्याने समस्या येतील.