कोस्टल रोडविरोधात मतदारांचा बहिष्काराचा इशारा
   दिनांक :20-Apr-2019
 
 
 मुंबई: कोस्टल रोडच्या विरोधासाठी वरळी कोळीवाड्यातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि शिवसेने विद्यमान खासदार अरिंवद सावंत यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
कोस्टल रोडसाठी सध्या मुंबई उच्च न्यायालयाने स्थगनादेश दिला असला तरी, आजपर्यंत कोणत्याही पक्षाने या कामामुळे मासेमारांचे होणारे नुकसान लक्षात घेतलेले नाही. आम्हाला कोणत्याही प्रकारची मदत केलेली नाही, असे सांगत वरळी कोळीवाड्यातील कोळी बांधवांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
 

 
 
वरळी कोळीवाड्यामध्ये ४० हजारांच्या घरात मतदार असतील, न्यायालयाचे दार ठोठावूनही राजकीय पक्षांनी आम्हाला न्याय दिला नाही. त्यामुळे ही भूमिका घेण्याची वेळ आली, असेही यावेळी कोळी बांधवांनी वृत्तसंस्थेस सांगितले.
वरळी कोळीवाडा हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार मानला जातो. या मतदारसंघातून कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीतर्फे मििंलद देवरा रिंगणात आहेत. बीडीडी चाळीतील रहिवाशानंतर कोळी बांधवांनीही मतदान केले नाही, तर त्याचा फटका दक्षिण मुंबई मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अरिंवद सावंत यांना आणि पर्यायाने भाजपाला बसेल, असे लिहिलेले बॅनर कोळीवाड्यात लागले होते. मात्र, निवडणूक आयोगाने ते काढून नेल्याची माहिती सूत्राने दिली.