अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभेकडे पुणेकरांची पाठ
   दिनांक :20-Apr-2019
 
 
पुणे: पुण्यात आज शनिवारी सकाळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला अल्प प्रतिसाद मिळाला. यासभेला फारशी गर्दी झाली नव्हती. मैदानातील खुर्च्या रिकाम्याच होत्या.
लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर, राज्यभरात सर्वपक्षीय नेत्यांचा सभांचा धडाका सुरू असून, वंचित बहुजन आघाडीचाही प्रचार जोमात सुरु आहे. मात्र, अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभेकडे आज पुणेकरांनी पाठ फिरवली.
 

 
 
महाराष्ट्रात चार टप्प्यांपैकी दोन टप्प्यांमधील मतदान झाले आहे. शेवटच्या दोन टप्प्यातील मतदानासाठी सध्या राजकीय पक्षांनीही कंबर कसली असून, भाजपा, सेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रचारसभा घेत आहेत. शनिवारी पुण्यातील वडगाव धायरी येथे बारामती लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नवनाथ पडळकर यांच्या प्रचारार्थ अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली.
दरम्यान, वंचित आघाडीच्या सभांना राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला होता. लाखोंचा समुदाय सभेसाठी गर्दी करताना दिसत होता. मात्र, पुण्यात वंचित आघाडीच्या सभेबाबत आज निरुत्साह दिसून आला. सभेला मिळालेला अल्प प्रतिसाद पाहता, वंचित आघाडीच्या उमेदवाराचे काय होणार, याबाबत चर्चा रंगली होती