तिसर्‍या टप्प्यात 115 मतदारसंघांत मतदान
   दिनांक :20-Apr-2019
लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्याचे मतदान 18 एप्रिलला संपले. आता तिसर्‍या टप्प्यात 14 राज्यात 115 जागांवर 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. गुजरात व केरळ येथे सर्व लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यात केरळमधील वायनाड जागेचा समावेश आहे. येथून कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी निवडणूक लढवीत आहेत. त्यांना भाजपा व डाव्या आघाडीशी सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रात 14 जागांवर मतदान होणार आहे.
या जागा पुढीलप्रमणे : उत्तर प्रदेश : मुरादाबाद, रामपूर, सम्भल, फिरोजाबाद, मैनपुरी, एटा, बदायूं, आंवला, बरेली, पीलीभीत.
आसाम : धुबरी, कोकराझार, बारपेटा, गुवाहाटी.
 

 
 
बिहार : झंझारपुर, सुपौल, अररिया, मधेपुरा, खगरिया.
छत्तीसगढ़ : सरगुजा, रायगढ़, जांजगीर-चांपा, कोरबा, बिलासपुर, दुर्ग, रायपूर.
गोवा : नॉर्थ गोवा, साऊथ गोवा.
गुजरात : सर्व जागा. खेड़ा, आणंद, अमरेली, बनासकांठा, साबरकांठा, पाटन, जुनागढ़, दाहोद, बारडोली, सुरेंद्रनगर, जामनगर, पोरबंदर, भरूच, गांधीनगर, अहमदाबाद पूर्व, अहमदाबाद पश्चिम, राजकोट, भावनगर, कच्छ, पंचमहल, वडोदरा, छोटा उदयपुर, सूरत, नवसारी, वलसाड, मेहसाणा.
जम्मू : अनंतनाग.
कर्नाटक : चिक्कोडी, बेलगांव, बागलकोट, बीजापुर, गुलबर्गा, बीदर, रायचूर, कोप्पल, बेल्लारी, हावेरी, धारवाड़ा, उत्तर कन्नड़, दावणगेरे, शिमोगा.
केरळ : सर्व जागा. इदुक्की, अलाथुर, कोल्लम, कासरगोड, पोनान्नी, तिरुवनंतपुरम, अिंट्टगल, आलप्पुझा, कन्नूर, वाडकरा, वायनाड, कोझिकोड, मल्लापुरम, पलक्कड़, त्रिचूर, चालाकुडी, एर्नाकुलम, कोट्टायम, मावेलिकारा, पथानामथिट्टा.
महाराष्ट्र : जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, म़ाढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-िंसधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले.
ओडिशा : संबलपुर, क्योंझर, ढेंकानल, कटक, पुरी, भुवनेश्वर.
दादर नगर हवेली : दादर नागर हवेली.
दमण दीव : दमण दीव.
पश्चिम बंगाल : बालुरघाट, मालदा उत्तर, मालदा दक्षिण, जंगीपूर, मुर्शिदाबाद.