मारहाण करुन ट्रक चालकाला लुटले
   दिनांक :20-Apr-2019
 
 
 
मालेगाव:  तीन आरोपींनी ट्रकचालकास ट्रकसह  काही अंतरावर नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व ट्रक चालकाजवळचे २ हजार ५०० रुपये घेऊन पोबारा केला. ही घटना १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दमर्‍यान घडल्याची तक्रार नामदेव विश्‍वनाथ करवर मालेगाव पोलिसात दिली.
 
 
 
 
याबाबत सविस्तर असे की, आयशर ट्रक क्र. एमएच २१ बीएच ०४०३ ने अमरावतीकडून मालेगाव मार्गे पुर्णा कडे जात असतांना मालेगाव शहरातील नागरदास रोडवरील विर लहुजी पुतळ्यासमोरील रस्त्यावर मोटारसयकलच्या अपघाताचे कारण करुन आरोपी योगेश विजय काळे रा. मालेगाव व मुन्ना जयस्वाल व त्यांचा साथीदार एक या तिंघांनी संगनमत करुन  काही अंतरावर ट्रक नेत ट्रक चालकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व त्याच्या  जवळचे पैसे लुटले.
याप्रकरणी एपीआय जी. एम. तडसे यांनी तपासाची चक्रे फिरवून सदर आरोपीतांचा रात्रीतून कसून शोध घेतला व ट्रकसह आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.