विकी कौशलला अपघात ; हनुवटीजवळ १३ टाके पडले
   दिनांक :20-Apr-2019
मुंबई:
एका भयपटासाठी अॅक्शन दृश्य चित्रित करताना 'उरी'फेम अभिनेता विकी कौशल याला अपघात झाला आहे. त्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्या हनुवटीजवळ १३ टाके पडले असल्याचे वृत्त आहे.
 
विकी सध्या गेल्या पाच दिवसांपासून गुजरातमध्ये दिग्दर्शक भानू प्रताप सिंग यांच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग करत आहे. एका जहाजावर रात्रीच्या वेळी घडणारा प्रसंग चित्रित करत असताना त्याला अपघात झाला. धावत जाऊन त्याला जहाजाचा दरवाजा उघडायचा होता. ते करत असताना दरवाजा त्याच्या अंगावर आदळला. तिथं उपस्थित असलेल्या टीम मेंबर्सनी तातडीनं त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तिथं प्राथमिक उपचारानंतर त्याला मुंबईला हलवण्यात आले आहे.