विजय गोखले करणार चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांशी चर्चा
   दिनांक :20-Apr-2019
बीजिंग,
भारताचे परराष्ट्र व्यवहार सचिव विजय गोखले उद्या रविवारी चीनच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर रवाना होत असून, ते जैशचा म्होरक्या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात चीनने आणलेली आडकाठी, तसेच विविध मुद्यांवर चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.
 

 
 
चीनसोबत नियमितपणे होणार्‍या चर्चेसाठी गोखले चीन दौर्‍यावर येत आहेत, अशी माहिती चीनमधील भारतीय दूतावासाने आज शनिवारी दिली. ते 22 एप्रिल रोजी चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांच्यासोबत चर्चा करती. त्यांच्या दौर्‍याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे, असे भारतीय दूतावासाने सांगितले.
 
मागील वर्षी परराष्ट्र व्यवहार सचिवपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी ते भारताचे चीनमधील राजदूत होते. त्यावेळी त्यांनी पुलवामा हल्ल्याबाबत चीनसोबत झालेल्या चर्चेत सहभाग घेतला होता.