कॉंग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा असेल - मुख्यमंत्री
   दिनांक :21-Apr-2019
 
 
 
असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री
 
 
सांगली: कॉंग्रेसमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्याचे काम पहिल्यांदा कुणी केले असेल तर ते सांगलीकरांनी केले आहे. या मतदारसंघात कॉंग्रेसला एकही उमेदवार सापडला नाही, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. सांगली येथे संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

 
 
सांगलीत द्राक्षे, डािंळब आणि इतर फळांच्या निर्यातीसाठी ड्रायपोर्टसाठी जागा निश्चित करण्यात आली असून, त्यादृष्टीने गतीने पावले टाकली जात आहेत. टेंभू, ताकारी, म्हैसाळ इत्यादी सिंचन प्रकल्पांना गती प्राप्त झाली आहे. रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये दिले जात आहेत. कधी नव्हे, इतक्या गतीने रस्त्यांची कामे आज संपूर्ण महाराष्ट्रात होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कॉंग्रेसच्या न्याय योजनेबाबत ते म्हणाले की, विरोधकांनी ५५ वर्षे देशावर राज्य केले. भ्रष्टाचार...घोटाळेही केलेत. आता म्हणे गरिबांना ७२ हजार देणार आहेत. कुठून देणार आणि कोणाला देणार, याची मात्र माहिती नाही. ही घोषणा म्हणजे कोंबड्या विकण्याची घोषणा आहे. राहुल गांधी यांचे भाषण म्हणजे मनोरंजनासारखे आहे. यावर कुणीही विश्वास ठेवू नये. देशाला खिळखिळी करण्याचे काम काही लोक करत आहेत, असा आरोपही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.