शंभर वर्षांच्या केळाजींनी केले मतदान
   दिनांक :21-Apr-2019
 
 
 
 
अचलपूर: अब्बासपुरा निवासी शंभर वर्षीय केळाजी भोजाजी झुडपे यांनी स्वतः आपल्या मुलाला मतदान केंद्रात घेऊन जाण्यास लावले व लोकशाहीच्या महाउत्सवात आपले मत नोंदवून उत्सव साजरा केला.
सचिन झुडपे यांचे वडील केळाजी भोजाजी झुडपे यांनी वयाची शंभरी गाठली. वयोवृद्ध असल्याने शारीरिक व्याधीमुळे ग्रासले आहे. आपल्या आयुष्यातील शेवटचे दिवस मोजत असताना आलेल्या भारतवर्षाच्या महान लोकशाहीच्या महाउत्सवात आपणही सहभागी व्हावे, अशी त्यांची मनोकामना होती. तब्येत ठीक नसल्याने घरचे त्यांना मतदान करण्यासाठी न्यायचे किंवा नाही या संभ्रमात असताना त्यांनी स्वतः आपला मुलगा सचिन याला आग्रह केला व त्याच्या दुचाकीवरून अब्बासपुरा नगर परिषद प्राथमिक शाळेत जाऊन मतदान नोंदवले.