"लाव रे तो व्हिडिओ" राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेला परवानगी
   दिनांक :21-Apr-2019
तरुण भारत ऑनलाईन   
मुंबई, 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सभांचा धडाका लावला आहे. आता त्यांना मुंबईतही 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणण्याचा मार्ग मोकळा झाला असून मुंबईतील काळाचौकी परिसरातील शहीद भगतसिंग मैदानावर पहिली सभा घेण्याची परवानगी मिळाली आहे. त्यांना २४ ऐवजी २३ तारखेला सभेसाठी परवानगी देण्यात आली आहे.

 
मुंबईत २४ तारखेला राज ठाकरेंच्या सभेसाठी परवानगी मिळावी म्हणून मनसेकडून प्रयत्न सुरू होते. एक खिडकी योजनेतून मनसेकडून सभेसाठी समन्वय अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती. परंतु, मनसे निवडणूक लढवत नसल्याने परवानगी नाकारण्यात आली होती. आता मात्र राज यांच्या सभेला २४ ऐवजी २३ एप्रिलला परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी आपल्या सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याचे   यांच्याविरोधात प्रचार करताना 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत सभांचा धडाका लावला आहे. आतापर्यंत राज यांनी नांदेड, सोलापूर, इचलकरंजी, सातारा, पुणे आणि महाडमध्ये सभा घेतल्या. त्यानंतर त्यांनी मुंबईतूनही भाजप-सेनेवर हल्ला चढवण्याची तयारी चालवली आहे. २९ एप्रिलला होणाऱ्या शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी ते आणखी काही सभा घेण्याची शक्यता आहे.