अमरिंसग यांनी आजम खानची काढली खरडपट्टी
   दिनांक :21-Apr-2019
रामपूर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा उमेदवार जया प्रदा यांच्या प्रचारार्थ खासदार अमर िंसह आले असता, त्यांनी रामपूरचे समाजवादी पक्षाचे उमेदवार आजम खान यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
 
 
 
आजम खान यांनी जया प्रदा यांच्याबाबतील अतिशय हीन पातळीची विधाने केली असताना, आता मायावती, ममता बॅनर्जी, सोनिया गांधी, मेहबूबा मुफ्ती यासारख्या राजकारणात असलेल्या महिला गप्प का आहेत? याचे उत्तर मला हवे आहे. त्यांना जया प्रदा यांच्या अपमान मान्य आहे काय? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
 
त्यांनी याचीही आठवण करून दिली की, दयाशंकर पांडेने मायावती यांच्याविरोधात तेव्हा अतिशय अभद्र भाषेत टिप्पणी केली होती. याचा सर्वांनीच विरोध केला. पण, आता जया प्रदा यांच्याबाबतीत आजम खान याने जी विधाने केली, त्याबाबत या सगळ्या महिला नेत्या गप्प का? मला वाटते, ज्या लोकांना विकासाचे मुद्दे नको आहेत, ते लोकच अंतर्वस्त्राच्या गोष्टी करीत आहेत. अशा प्रकारची राजकीय चर्चा कोणत्या थराला जात आहे? अमरिंसग म्हणाले, पुरुषांच्या अंतर्वस्त्राबाबत का बोलले जात नाही? आजम खान यांना माझी समस्या असेल तर त्यांनी मला माझ्या अंडरवीयरचा रंग विचारावा. मी आजमखानला खुले आव्हान देतो की, त्यांनी माझ्या अंडरवीयरच्या बाबतीत विचारावे. महिलांच्या अंडरवीयरबाबत बोलू नये. आजम खानमध्ये ताकद असेल तर त्याने माझी लंगोटचे मोजमाप घ्यावे.
 
मैनपुरीमध्ये मुलायमिंसह यादव आणि मायावती एकाच व्यासपीठावर आल्याबद्दल अमर सिंह म्हणाले, मुलायमिंसह जे बोलतात, त्याने युवकांची मने प्रफुल्लित होतात. (मुलायम यांनी बलात्काराच्या मुद्यावर असे विधान केले होते की, ते युवक आहेत, त्यांची भावना तर जागेलच. पण, त्यासाठी फाशी देऊ नये). मुलायमिंसग यांच्या कार्यकर्त्यांनी तेव्हा मायावतींचे कपडे फाडले होते, मारहाण केली होती व अभद्र भाषेत अपमान केला होता. आता त्याचा विसर दोघांनाही पडलेला दिसतो तो केवळ सत्तेसाठी. भाजपा या निवडणुकीत 300 पेक्षा अधिक जागा िंजकेल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.