५५ वर्षांपासून बेपत्ता असलेल्याची मृत्यूनंतर पटली ओळख
   दिनांक :21-Apr-2019
 
डायरी मधील मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून दोन तासात लावला मृत अनोळखी इसमाच्या परिवाराचा शोध
 
५५ वर्षापासून होता घरापासून दुर : भिक्षा मागुन भरायचा पोट 
 
कारंजा ग्रामीण पोलिसांची कर्तव्य तत्परता : खेडाॅ बु ! येथील घटना
 
उंबडाॅबाजार : येथील ग्रामीण पोलिस स्टेशन च्या कार्यक्षेत्रात येणार-या खेडा बु. येथील बसस्थानक परिसरात दि. २० एप्रिल रोजी दुपारी ११ वाजताच्या सुमारास एका ७० वर्षीय अनोळखी इसमाचे शव आढळून आले. प्राप्त माहितीनुसार पोलीसांनी घटनास्थळ गाठून तंटामुक्ती समिती अध्यक्ष सतिश खंडागळे यांचे यांचे तक्रारी वरून कारंजा ग्रामीण पोलिसांनी  ९\१९ कलम १७४ जा . फौ. नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद घेवून मृत इसमाचे शव कारंजा लाड उपजिल्हा रुग्णालयात ठेवले.
 
 

 
 
त्यानंतर कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशन चे ठाणेदार धनंजय जगदाळे यांनी मृतक इसमाच्या परिवाराचा शोध घेण्याची जबाबदारी पो. हे. काॅ. शेषराव जाधव व सुभाष चौधरी यांच्यावर सोपविली . मात्र तपासादरम्याण धक्कादायक वास्तव समोर आले. गेल्या १० वर्षापासून मृतक इसम हा खेडा बु! येथे हाॅटेल व गांवात भिक्षा मागुन आपली गुजराण करीत होता. या दरम्यान त्याने गांवातील लोकांना आपण कुठंले ; कोण याची काहीही माहिती दिली नसल्याने पोलीसांसमोर मृतकाच्या परीजनाचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले होते.
 
पोलिसांनी मृतक इसम राहत असलेल्या ठिकाणाचा शोध घेवून त्याच्या सामानाची तपासणी केली असता एका गाठोड्यात एक डायरी आढळून आली . डायरीची पाहणी केली असता डायरीत नांवाची नोंद नसलेला एक मोबाईल नंबर दिसून आला . पोलीसांनी डायरीतील मोबाईल नंबर संपकॅ साधाला असताप्रतिसाद दिला प्रतिसाद मिळुन मृतक इसम हा यवतमाळ येथील सिव्हील लाईन भागात राहणारा हरिचंन्द्र रामजी हेडावू असल्याचे तपासादरम्याण पुढे आले. पोलिसांच्या सुचनेनुसार यवतमाळ येथील हेडावू परिवाराने कारंजा लाड येथील उपजिल्हा रुग्णालय गाठून मृत इसमाचे शव हे हरिचंन्द्र हेडावू चेच असल्याचे सांगितले.
 
त्यानंतर मात्र हेडावू परिवाराने हरिचंन्द्र बाबत सांगितलेली माहिती मन सुन्न करणारी होती . हरिचंन्द्र हा १५ वर्षाचा असताना घरात चोरी केली म्हणून वडिलांनी मारहाण केली म्हणून घरून निघून गेला होता . गेली ४५ वर्षे त्याचा पत्ताच लागला नव्हता त्यानंतर गेल्या १० वर्षापुर्वी एकदा यवतमाळ गाठून आई वडिलाची चौकशी केली मात्र आई वडिल हयात नसल्याचे समजल्याने एकच दिवस आपल्या भावाकडे राहून लहान भावाचा मोबाईल नंबर डायरी मध्ये नोंद करून पुन्हा खेडाॅ बु! गांव गाठूण गांवात भिक्षा मागुन आपली गुजराण करू लागला होता .
 
मात्र दि. २० एप्रिल रोजी ७० वर्षीय हरिचंन्द्र चा आकस्मिक मृत्यू झाल्याने कारंजा ग्रामीण पोलीसांनी डायरी मधील नोंद लेल्या मोबाईल नंबर वरून गेल्या ५५ वर्षापासून घरापासून दूर राहिलेल्या मृतक हरिचंन्द्र च्या परिवाराचा केवळ दोन तासात शोध घेवून कारंजा ग्रामीणपोलिस स्टेशन चेठाणेदार धनंजय जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली शव कुटुंबियांच्या ताब्यात देण्यासाठी दाखविलेल्या कतॅव्य तत्परते बद्दल पो.हे. काॅ.शेषराव जाधव व सुभाष चौधरी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.