श्रीलंका स्फोट ; भारतीयांसाठी हेल्पलाईन सुरु
   दिनांक :21-Apr-2019
नवी दिल्ली,
 श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या वृत्तामुळे कोट्यवधी भारतीय चिंतेत आहेत. श्रीलंकेतील कोलंबो शहरात राहणाऱ्या भारतीय नागरिक, तसेच भारतीय वंशाच्या लोकांची संख्या मोठी आहे. आता पर्यंत या स्फोटात कोणत्याही भारतीयाला दुखापत झाल्याचे वृत्त आलेले नाही. या पार्श्वभूमीवर आपण कोलंबोतील भारतीय दूतावासाशी सतत संपर्क ठेवून आहोत असे परराष्ट्र मंत्री  सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे.
 
 
कोलंबोतील परिस्थितीवर आम्ही नजर ठेवून असल्याची माहिती देणारे ट्विट भारतीय दूतावासाने केले आहे. या ट्विटमध्ये भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. कोलंबो आणि बट्टीकालोआमध्ये स्फोट झाल्याची माहिती आम्हाला मिळाली असून आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. मदत किंवा इतर माहितीसाठी भारतीय नागरिकांना संपर्क करता यावा साठी क्रमांकही देण्यात आले आहेत.
 
 
 
संपर्क क्रमांक:
+९४७७७९०३०८२, +९४११२४२२७८८ +९४११२४२२७८९,
श्रीलंकेतील संपर्क क्रमांकाव्यतिरिक्त खालील भारतीय क्रमांकावरही भारतीय संपर्क करू शकतात:
+९४७७७९०२०८२ +९४७७२२३४१७६