चेन्नई समोर बंगळुरूचे आव्हान
   दिनांक :21-Apr-2019
बेंगळुरु,
चेन्नई सुपरकिंग्स रविवारी रॉयल चॅलेंसर्ज बँगलोरवर विजय मिळवून ‘प्ले ऑफ’कडे कूच करण्याच्या इराद्यासह उतरणार आहे. गतविजेत्या चेन्नईला मागच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादकडून पराभवाचा धक्का बसला होता. यंदाच्या सत्रात हा त्यांचा दुसरा पराभव आहे. आरसीबीवर विजय मिळाल्यास चेन्नईचे १६ गुणांसह ‘प्ले आॅफ’मधील स्थान निश्चित होईल.
 
 
 
 हैदराबादविरुद्ध दुखापतीमुळे धोनी खेळू शकला नव्हता. रविवारी मात्र तो नक्की खेळणार, असे संकेत मिळाले आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीपासून उभय संघाची वाटचाल वेगळ्या दिशेने झाली. चेन्नईने पाठोपाठ विजय मिळविले तर आरसीबी संघ पराभवाच्या खाईत लोटत गेला. शुक्रवारी केकेआरवर विजय मिळविल्याने आरसीबीचा आत्मविश्वास वाढला असेल.
आंद्रे रसेल व नितीश राणा यांच्या चमकदार कामगिरीनंतरही आरसीबीने वर्चस्व गाजविले. त्यांचा नऊ सामन्यात हा दुसरा विजय होता. २०१६ मध्ये देखील आरसीबीने सुरुवातीला सात सामने गमविल्यानंतर अखेरच्या सातपैकी सहा सामन्यात विजय नोंदवून प्ले आॅफमध्ये धडक दिली होती.