वाढत्या उष्णतेने आजारांमध्ये वाढ
   दिनांक :21-Apr-2019
 
 
भंडारा : गेल्या सात-आठ दिवसांपासून शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. पारा ४२ अंश सेल्सियसवर गेला आहे. उष्णतामानामुळे उलट्या, हगवणीसारखे आजार होत आहेत. डोळ्यांच्या आजारातही वाढ झाली आहे. वाहनांमुळे प्रचंड प्रदूषण होत आहे. उष्णतेची दाहकता वाढल्यामुळे नागरिकांमध्ये विविध प्रकारचे आजार बळावत आहेत. वाढत्या उष्णतामानात विशेष काळजी घेण्याची गरज आहे.