शत्रुघ्न सिन्हाच्या दुहेरी ‘गेममुळे’ बिहार कॉंग्रेसमध्ये असंतोष
   दिनांक :21-Apr-2019
शत्रुघ्न सिन्हा हे बिहारच्या पाटणा मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार असताना, आपला प्रचार सोडून ते समाजवादी पक्षाच्या उमेदवार त्यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांच्या प्रचारासाठी गेल्याने बिहार कॉंग्रेसमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
 

 
 
पूनम सिन्हा यांना लखनौ मतदारसंघातून समाजवादी पक्षाने, केंद्रीय गृह मंत्री राजनाथिंसह यंाच्याविरोधात लढण्यासाठी तिकिट दिले आहे. शत्रुघ्न सिन्हा हे पाटणा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे उमेदवार आहेत. उत्तरप्रदेशात सपा-बसपा-रालोद युतीने कॉंग्रेसला बाहेर ठेवले आहे. उत्तरप्रदेशात कॉंग्रेस सपा-बसपासोबत लढत असताना, शत्रुघ्न सिन्हा आपल्या पत्नीच्या प्रचारार्थ समाजवादी पक्षाचा प्रचार करण्यासाठी गेले. तेथे त्यांनी मुलायमिंसह यादव आणि मायावतींची तोंडभरून स्तुती केली. अखिलेश यादव हे युवकांचे आयकॉन आहेत, असेही ते म्हणाले. तेथे त्यांनी पूनमच्या प्रचारार्थ रोड शो सुद्धा केला. त्यामुळे पाटणामधील कॉंग्रेस कार्यकर्ते संतापले आहेत.
 
शत्रुघ्न सिन्हाचे म्हणणे आहे की, मी आधी आपल्या कुटुंबासोबत आहे. त्यामुळे मी पन्नीधर्म स्विकारला आहे. माझ्या या कृतीची कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पूर्ण जाणीव आहे. कॉंग्रेस श्रेष्ठींनी अजून आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, कॉंग्रेस कार्यकर्ते उघडपणे बोलू लागले आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी विसरू नये की, अनेक लोकांचे तिकिट कापून पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी गांभीर्याने पक्षधर्माचे पालन केले पाहिजे.
 
तिकडे बिहारमध्ये मायावती यांनी सर्वच्या सर्व 40 जागी आपले उमेदवार उभे केले आहेत. लालूंच्या राज्यात दलितांवर अनन्वित अत्याचार झाल्याचा आरोप मायावतींनी केला आहे. त्यामुळेच आपण सर्व ठिकाणी उमेदवार उभे केल्याचे मायावतींचे म्हणणे आहे. गतवेळी विधानसभा निवडणुकीत येथे मायावतींना 2.7 टक्के मते मिळाली होती.