आशियाई बॅडमिंटनसाठी प्रणॉय, साई प्रणितला डच्चू
   दिनांक :22-Apr-2019
हैदराबाद, 
मंगळवारपासून वुहान येथे प्रारंभ होणार्‍या आशियाई बॅडिंमटन अजिंक्यपद स्पर्धेत एच.एस. प्रणॉय व बी. साई प्रणित यांना भाग घेण्याास भारतीय बॅडिंमटन संघटनेने नकार दिला आहे.
 
 
प्रणॉय हा गतवर्षीचा कांस्यपदक विजेता होता. काहीही चुकी नसताना प्रणॉयला यंदा आपले विजेतेपद कायम राखता येणार नाही. नियमानुसार सर्व अव्वल देशातील चार प्रवेशिकांना मु‘य फेरीत स्थान देण्यात आले. गतवर्षी भारताने पुरुषांच्या एकेरीत चार खेळाडू खेळविले. बॅडमिंटन आशियानेही खेळाडूंच्या मानांकनाच्या आधारे चार पात्र खेळाडूंची नावे राष्ट्रीय संघटनेकडे पाठविली होती. यात बॅडमिंटन आशियाने किदाम्बी श्रीकांत, समीर वर्मा, एच.एस. प्रणॉय व साई प्रणित यांच्या नावाची शिफारस केली होती, हे येथे उल्लेखनीय. मात्र आश्चर्यकारकरीतिने भारतीय बॅडमिंटन संघटनेने केवळ दोन प्रवेश निश्चित केले व प्रणॉय व साईला वगळले.