फ्रान्स फेड कपच्या अंतिम फेरीत
   दिनांक :22-Apr-2019

 
पॅरिस,
फेड कप टेनिसच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रतिस्पर्धी म्हणून खेळण्याचे आपले स्थान  फ्रान्सने सुनिश्चित केले. फ्रान्सने रोमानियावर 3-2 अशा फरकाने रोमांचक विजय नोंदविला. कॅरोलिन गार्सिया व क्रिस्तिना लादेनोव्हिक फ्रान्सच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. रोलॅण्ड गॅरोसवरील दुहेरीची माजी विजेती जोडी गार्सिया व क्रिस्तिना यांनी सिमोना हॅलेप-मोनिका निकुलेस्कू या जोडीवर 5-7,6-3, 6-4 असा विजय नोंदविला. या विजयाबरोबरच  फ्रान्सने नोव्हेंबर महिन्यात फेड कपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढण्याचे सुनिश्चित केले.