पुलगावत अवैध वाळू चोरी; दोन ट्रक जप्त
   दिनांक :22-Apr-2019
पुलगाव, 
वर्धा नदीचे पाणी असल्यामुळे सध्या वाळू चोरी वाढली आहे. वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच खनिकर्म विभागाने छापा टाकून वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त केले.
याही वर्षी येथील नदीवरील वाळू घाटाचा लिलाव झाला नसल्याने पाणी आटल्यामुळे वाळू चोरी करणाऱ्यांना आयती संधी मिळाली. दिवसभर सावध चोरी करणारे रात्री मात्र बिनबोभाट पणे वाळू चोरी करीत आहेत. वाळू चोरीची कुणकुण लागताच जिल्हा खनिकर्म विभागाच्या चमूने छापा टाकून एमएच ३२ ए एस ५०२ व ट्रॉली क्रमांक एमएच ३२ ए ९४६५ या दोन ट्रॅक्टरनां जप्त केले आहे. पंचनामा करण्यासाठी येथील नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांना पाचारण करण्यात आले होते. 
 
 
या शिवाय गुंजखेडा बाटा नजीक हनुमान मंदिराजवळ जवकपास १५ ते २० ब्रास वाळूसाठ्यासाठी मोका पंचनामा, कुलभूषण येथील नवीन वसाहत जवळ वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास २०० ब्रांस वाळू, अशोक राहिले यांच्या घराच्या आजूबाजूला असा एकुन ५२० ब्रास वाळू बाबत मोका पंचनामा, जोशी प्लॉट परिसरातील नगराळे यांच्या घराजवळ ५ ब्रांस, फुलझेले यांच्या घराजवळ १५ ब्रांस, चर्च जवळ २० ब्रांस, माहुरे कॉन्व्हेंट जवळ १६ ब्रांस, पूनम प्यालेस मंगल कार्यालय पार्कींग परिसरात ४०० ब्रांस वाळूसाठ्याबाबत मोका पंचनामा करून अहवाल सादर करण्यच्या सूचना जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी दिल्या आहे.