भव्य रांगोळी काढून जागतिक वसुंधरा दिवस साजरा
   दिनांक :22-Apr-2019
 
 
अमरावती: जागतिक वसुंधरा दिनी जनसामान्यांचे लक्ष भूमातेकडे वेधून घेण्यासाठी संस्कार भारती हा दिवस भू- अलंकरण दिवस म्हणून साजरा करते. या निमित्ताने संस्कार भारतीच्या रांगोळी कलावंतांनी भव्य रांगोळ्यांच्या माध्यमातून पृथ्वीला अभिवादन केले. पर्यावरण रक्षणाचा संदेश कलेच्या माध्यमातून देण्याचा संस्कार भारतीचा हा प्रयत्न आहे. जन,जल,जंगल व जमीन यांचे संवर्धन व्हावे हा उद्देश आहे.
 

 
 
 
संस्कार भारती अमरावतीच्या वतीने आज श्री एकवीरा मंदिराच्या मागील बाजुच्या प्रांगणात भव्य रांगोळी रेखाटण्यात आली. ती बघायला शेकडो नागरिकांनी भेटी दिल्या. संस्कार भारती रांगोळी विधेचे अनिता- विजय शेलुकर व दीपक जोशी यांच्या नेतृत्वात ही रांगोळी कार्यकर्त्यांनी रेखाटली.