'छपाक' चित्रपटातील सीन लीक
   दिनांक :22-Apr-2019
 - सोशल मीडियावर खळबळ
सध्या दीपिका पादुकोण 'छपाक' सिनेमामुळे चर्चेत आहे. दीपिका या सिनेमात अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारत आहे. 'छपाक'च्या शूटिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दीपिकाला ओळखणे देखील कठीण झाले होते. या सिनेमातील दीपिकाच्या लूकची चर्चा रंगली असताना तिच्या आणखीन एका व्हिडीओमुळे सोशल मीडिवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्याचे पाहायला मिळते आहे. दीपिकाचा हा व्हिडीओ सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर लिक झाल्यापासून फक्त दीपिकाचीच चर्चा रंगत असल्याचे पहायला मिळते आहे. लिक झालेला व्हिडीओत विक्रांत आणि दीपिका गच्चीवर एकमेकांना किस करताना पाहायला मिळतायेत.
 
 
शूटिंग दरम्यान तेथील रहिवास्यांनीही मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. ही गर्दी इतकी होती की सिनेमाच्या टीमलाही त्यांना सांभाळणे कठिण जात होते. दीपिका आणि विक्रांतचा हा किसींग सीन शूट होत असताना लोकांच्या गर्दीमुळे शूटिंगला अडथळा निर्माण होत होता. तरीही दीपिकाने आपले लक्ष विचलीत न करता आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले होते. किसिंग सीन व्हिडीओ आधीही दीपिकाचा याच सिनेमातील आणखीन एक व्हिडीओ लिक झाला होता. त्यात दीपिका स्कूल यूनिफॉर्ममध्ये दिसली होती.
सध्या दिल्लीमध्ये या सिनेमाच्या काही भागाचे शूटिंग सुरू असून संपूर्ण टीमला भयंकर उकाड्याला समोरे जावे लागत आहे. खासकरून दीपिका आपल्या खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष देत उकाड्यापासून संरक्षण करण्यासाठी ती सात्तूचे पेय घेते. दीपिकाला या भूमिकेसाठी मेकअप करण्यासाठी जवळजवळ तीन-चार तास लागतात आणि पुन्हा हा मेकअप काढण्यासाठी त्यापेक्षा देखील अधिक वेळ लागतो. 'छपाक' सिनेमा दीपिकाची भूमिका प्रचंड आव्हानात्मक असून सध्या ती या भूमिकेवर प्रचंड मेहनत घेत आहे. छपाक' सिनेमाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करणार असून हा सिनेमा १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.