श्रीलंकेत मध्यरात्रीपासून आणीबाणी घोषित
   दिनांक :22-Apr-2019
कोलंबो,
श्रीलंकेत ईस्टर संडे साजरा होत असताना झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आज मध्यरात्रीपासून श्रीलंकेत राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याची घोषणा श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी केली आहे. दरम्यान, श्रीलंकेत झालेल्या ८ साखळी बॉम्बस्फोटांना स्थानिक इस्लामी अतिरेकी संघटना नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) जबाबदार असल्याचे श्रीलंका सरकारचे प्रवक्ता राजीथा सेनारत्ने यांनी घोषित केले आहे.

 
 
रविवारच्या साखळी बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा २९०वर पोहोचला आहे. यात ४ जनता दल धर्मनिरपेक्ष (जेडीएस) पक्षाच्या कार्यकर्त्यांसह ७ भारतीयांचा समावेश आहे. जेडीएसचे कार्यकर्ते एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी श्रीलंकेत गेले होते. स्फोट झाले तेव्हा ते एका हॉटेलात थांबलेले होते. मात्र, अजूनही मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.