सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाचा भाजपा-सेना उमेदवारांना पािंठबा

    दिनांक :22-Apr-2019
 
ठाणे: भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना पािंठबा देण्याची जाहीर भूमिका ठाणे जिल्ह्यातील सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. मराठा आरक्षण, वसतिगृहे यांच्यासह मराठा समाजाचे अनेक प्रश्न आणि मागण्या मार्गी लावण्यासाठी, सातत्याने समाजाच्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग आणि पुढाकार घेणार्‍या मराठा उमेदवारांनाही पािंठबा देण्याचे मराठा क्रांती मोर्चाने ठरवले आहे.
 

 
 
मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाकडून ठाण्यात रविवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी म्हणाले, ठाणे जिल्ह्यातील वसतिगृहाचा प्रश्न पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गी लावला, तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने समाजासाठी स्वतंत्र स्मारक उभारण्याचे आश्वासन दिलेले आहे. दोन्ही संघटनांतर्फे भाजपा महायुतीचे कल्याणमधील उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे, ठाण्याचे उमेदवार राजन विचारे, भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील आणि पालघरचे उमेदवार राजेंद्र गावित यांना पािंठबा देण्यात येणार आहे. यावेळी मराठा महासंघाचे सरचिटणीस सुरेश माने, कैलाश म्हापदी आणि ठाणे, कल्याण, नवी मुंबई, भिवंडी, पालघरमधील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते.