राज ठाकरेंचे इंजिन बंद : रामदास आठवले

    दिनांक :22-Apr-2019
 
 
सांगली: बहुजन वंचित आघाडी ही वंचितांना सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी आहे, तर राज ठाकरे यांचे इंजिन बंद असून, त्या इंजिनमध्ये डिझेलही नसल्याने ते पुढे जाणार नाही, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइं नेते रामदास आठवले यांनी सांगलीत केली. कॉंग्रेसवाले आता, राज ठाकरे यांच्या मागे लागले आहेत. पण, राज ठाकरेंचं इंजिन बंद आहे, असेही ते म्हणाले.
 

 
 
सांगलीत कॉंग्रेसला संपवण्याचे काम कॉंग्रेस करीत आहे. सांगलीच्या जागा जिंकण्याची शाश्वती नसल्याने ही जागा कॉंग्रेसने स्वाभिमानीला दिली. विशाल पाटील यांनी स्वाभिमानीसोबत जायला नको होते. वसंतदादा यांची मानहानी करण्याचे काम कॉंग्रेसने केले, अशी टीकाही यावेळी आठवले यांनी केली.
आठवले म्हणाले, 56 पक्ष मिळून तुम्ही आघाडी केली आहे. पण, भाजपा महायुती तुम्हाला पुरून उरणार आहे. नरेंद्र मोदी पुन्हा निवडून येऊ नयेत, असे विरोधक म्हणत आहेत, तर मोदीच पुन्हा निवडून यावे, असे लोक म्हणत आहेत.
‘काकाने मजबूत केला आहे प्रत्येक नाका, कमळाला मतदान करून मुख्यमंत्र्यांचा मान राखा’, अशी त्यांच्या खास शैलीतील चारोळी यावेळी रामदास आठवलेंनी यावेळी सादर केली.