ट्रेलर शिवशाही बसवर धडकला
   दिनांक :22-Apr-2019
 
 
कुरूम(अकोला): राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर नवसाळ फाट्यानजीक लोखंडी पत्रा घेऊन भरधाव ओव्हरटेक करीत असलेला ट्रेलर शिवशाही बसवर धडकला. या भीषण अपघातात शिवशाही बसच्या चालकासह अंदाजे १६ ते १७ प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णवाहिकेव्दारे उपचाराकरिता अमरावती येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

 
 
प्राप्त माहितीवरून अमरावतीवरून अकोल्याकडे ७५,५८० कि.लो.लोखंडी पत्राचा रोल घेऊन जाणारा ट्रेलरच्या चालकाने ओव्हरटेक करीत ब्रेक लावले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ट्रेलर उलटला. त्यामधील असलेला लोखंडी पत्रा रोल खाली कोसळला. हा ट्रेलर समोरून येणाऱ्या शिवशाही बसवर धडकला. यावेळी बसच्या केबिनचा चुराडा होऊन चालकासह १६ ते १७ प्रवाशी गंभीर जखमी झाले. ही बस नाशिकवरून नागपूरला जात होती. यात २६ प्रवासी प्रवास करीत होते.
जखमींना पोलीस व नवसाळ, कुरूम येथील गावकऱ्यांनी बसचा काचा फोडून बाहेर काढले व रुग्णवाहिकेव्दारे उपचाराकरिता अमरावतीला हलविले.