...तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन - अजित पवार
   दिनांक :23-Apr-2019
बारामती,
‘भाजपाने जर बारामतीत विजय मिळवला तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन’ असे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले आहे. पण ‘भाजपला बारामती जिंकता आली नाही तर, त्यांनी निवृत्ती घ्यावी’ असेही अजित पवार म्हणाले.  
 
बारामती मधील वाकडेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत अजित पवार यांनी आपल्या पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी प्रत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
बारामतीतून राष्ट्रवादीच्या नेत्या आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे निवणुकीच्या रिंगणात असून त्यांना भाजपाच्या कांचन कुल या टक्कर देत आहेत. देशभरात आज तिसऱ्या टप्यातील मतदान होत आहे. राज्यातील 14 मतदारसंघांसह देशातल्या एकूण 117 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या दिग्गाजांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.