‘या’ दोघी ५४ वर्षांनंतर भारताला विजेतेपद जिंकून देण्यास सज्ज
   दिनांक :23-Apr-2019
वुहान, 
एकापोठापाठ स्पर्धा खेळल्यानंतर एका आठवड्याची विश्रांती घेऊन ताजातवाण्या झालेल्या पी.व्ही.सिंधू आणि सायना नेहवाल आता बुधवारपासून येथे प्रारंभ होणार्‍या आशियाई बॅडिंमटन स्पर्धेत भारताला तब्बल 54 वर्षांनंतर पदक जिंकून देण्यास सज्ज झालेल्या आहेत. 1965 साली दिनेश खन्ना हे आशियाई बॅडिंमटन स्पर्धेत सुवर्णपदकजिंक णारे पहिले भारतीय पुरुष एकेरी विजेते ठरले होते. गतवर्षी एच.एस. प्रणॉयच व सायना नेहवाल यांनी आपापल्या गटात कांस्यपदक जिंकले होते.
 
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दोनवेळा सुवर्णपदकजिंक णार्‍या सायनाने 2010 व 2016 साली आशियाई स्पर्धेत कांस्यपदके मिळविली होती, तरसिंधू ने दक्षिण कोरियात झालेल्या आशियाई स्पर्धेत कांस्यपदक मिळविले आहेत. गतविजेती तई त्झु यिंग हिने या स्पर्धेतून माघार घेतली असली तरी या दोघी ड्रॉमध्ये अकाने यामागुची, चेन युफेई, रत्चानोक इंतानोनसार‘या' दिग्गजांना तोंड देण्यास सज्ज आहे. 
 
 
या मोसमात सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराकडून पराभूत होण्यापूर्वी सिंगापूर ओपनमध्ये आपली दुसरी उपांत्य फेरी गाठली होती, तर सायनाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. सायनासुद्धा ओकुहाराकडून हरली होती.
गत डिसेंबर महिन्यात वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धा जिंकणारी सिंधू आता या मोसमातील आपले पहिले विजेतेपदजिंक ण्यास उत्सुक राहील. सिंधूचा सलामीचा सामना जपानच्या सायका ताकाहाशीविरुद्ध होणार आहे.सिंधू जिंकल्यास पुढील फेरीत तिची गाठ थायलंडच्या पॉर्नपावी चोचुवॉंगशी पडण्याची शक्यता आहे. मलेशिया ओपनमध्ये पॉर्नपावीने सायनाला हरविले होते.
 
सायना ही विजेतेपद पटकावणारी एकमेव भारतीय खेळाडू असून तिने इंडोनेशिया मास्टर्स विजेतेपद पटकावले होते. पोटाच्या त्रासामुळे तिला दोन स्पर्धेला मुकावे लागले होते. क्वालालम्पूर येथे पहिल्या फेरीत सायनाला पॉर्नपावीकडून पराभवपत्करावा लागला असला तरी तिने या पराभवाचा वचपा सिंगापूरमध्ये घेतला. हैदराबादची 29 वर्षीय सायनाला सातवे सीिंडग मिळाले असून आपले दुसरे विजेतेपद जिंकण्याचे ध्येय उराशी ठेवून ती सलामीची लढत चीनच्या हान युईविरुद्ध खेळणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत सायनाची गाठ जपानच्या अकाने यामागुचीशी पडण्याची शक्यता आहे.
 
पुरुषांच्या एकेरीत किदाम्बी श्रीकांतने गत काही आठवड्यात आपला चांगल्या फॉर्मचे प्रदर्शन केले. इंडिया ओपनमध्ये त्याने अंतिम फेरी गाठली, तर त्यानंतरच्या दोन स्पर्धेत त्याने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. गुंटूरच्या 26 वर्षीय श्रीकांतचा पहिला सामना इंडोनेशियाच्या शिसर हिरेन र्‍हुस्ताव्हितो याच्याशी होणार आहे. त्याचा पुढील सामना तिएन मिन्ह गुएनशी होण्याची शक्यता आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्याच्यासमोर ऑलिम्पिक विजेत्या चीनच्या चेन लॉंगचे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
 
 सिंगापूरच्या स्पर्धेत अंतिम आठमध्ये स्थान मिळविणार्‍या समीर वर्माचा सलामीचा सामना जपानच्या काझुमासा सकाईविरुद्ध होणार आहे. पुढील फेरीत त्याची गाठ सहावा सीड इंडोनेशियाच्या सिनीसुका गिंटिंगशी पडण्याची शक्यता आहे.