लढत बरोबरीत सुटल्याने चेल्सीच्या आशा धुसर
   दिनांक :23-Apr-2019
लंडन,
चेल्सी आणि बर्नली संघादरम्यानचा सामना 1-1 गोलने बरोबरीत राहिला. चेल्सी संघ चौथ्या स्थानावर सरकला, परंतु त्यांच्या टूकार प्रदर्शनामुळे चॅम्पियन्स लीगमध्ये पात्र मिळण्याच्या आशा धुसर झाल्या आहे. जेफ हेनड्रिक्सच्या शानदार गोलमुळे मॉरिझियो सारीचा संघ एका गोलने पिछाडीवर राहिला, मात्र काही क्षणांनी न’गोलो कांतेने गोल नोंदवून सामना बरोबरीत आणला. 

 
 
त्यानंतर गोन्झॅलो हिग्यूएनने चेल्सीला आघाडीवर नेले, परंतु बर्नलीच्या अॅश्ले बर्नेसने गोल नोंदवून सामना 2-2 गोलने बरोबरीत राखण्यास मदत केली. अखेरच्या दोन सामन्यात चेल्सी विजयाविना राहिला. एका गुणाने चेल्सी चौथ्या स्थानाव गेला असून पाचव्या स्थानावर अर्सेनल व तिसर्‍या स्थानावर टोटेनहॅम हॉटस्पर संघ आहे. आता जर बुधवारी अर्सेनलने वॉल्व्हज्‌विरुद्धच्या सामन्यात पराभव टाळला, तर ते चेल्सीच्या जागी चौथे स्थान मिळवू शकतात.