फुटबॉल तांत्रिक संचालकपदी रोमानियाचे दोरू इसाक!
   दिनांक :23-Apr-2019
पणजी,
रोमानियाचे प्रशिक्षक दोरू इसाक यांची फुटबॉलप्रती असलेली कटिबद्धता व त्यांची संपूर्ण माहिती बघून अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची तांत्रिक समिती प्रभावित झाली आहे. त्यामुळे भारतीय फुटबॉल संघाच्या तांत्रिक संचालकपदाच्या शर्यतीत दोरू आघाडीवर आहे. 
 
 
 
अ.भा. फुटबॉल महासंघाने या पदासाठी अर्जांची छाननी केल्यानंतर तीन उमेदवारांना सोमवारी मुलाखतीसाठी बोलाविले होते, परंतु दोघांनी त्याकरिता भारतात येण्यास असमर्थता दर्शविली व त्यांनी स्कायपीवर मुलाखत देण्यास पसंती दर्शविली. मात्र दोरू इसाक यांनी अमेरिकेहून लांबलचक दौरा करत दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानाने दिल्लीत दाखल झालेत.