विझाडर्‌‌सने जिंकली आमंत्रित हॉकी स्पर्धा
   दिनांक :23-Apr-2019
नवी दिल्ली,
युनायटेड फॉर हॉकी (यूएफएच) च्या वतीने आयोजित तिसर्‍या यूएफएच आमंत्रित चषक हॉकी स्पर्धेत यूएफएच विझार्ड्‌स संघाने अिंजक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात विझार्ड्‌सने दी डुन स्कूल डेहरादून संघावर 1-0 ने विजय नोंदविला. राजवीर झाला हा विझार्ड्‌सच्या विजयाचा शिल्पकार ठरला. 

 
 
अटीतटीच्या निर्णायक लढतीत राजवीरने महत्त्वपूर्ण एकमेव विजयी गोल नोंदविला. या स्पर्धेसाठी देशातील चार प्रीमियर पब्लिक स्कूलच्या संघांना आमंत्रित करण्यात आले होते. यूएफएचचे दोन संघ- विझार्ड्‌स व मॅजिशियनचा समावेश होता. स्पर्धेतील सहभागी संघांची अंतिम स्थिती अशी-
  1. यूएफएच विझार्ड्‌स,
  2. दी डून स्कूल डेहरादून,
  3. मेयो कॉलेज अजमेर,
  4. यूएफएच मॅजिशियन,
  5. दी सिंधिया स्कूल ग्वाल्हेर 
  6. वेलहॅम बॉईज स्कूल डेहरादून.