प्रदर्शनापूर्वीच 'अव्हेंजर्स'ने बाहुबलीचा विक्रम मोडला, खान मंडळीही मागे
   दिनांक :23-Apr-2019
नवी दिल्‍ली,
हॉलिवूडचा सर्वात मोठा सुपरहिरोपट असेलेला 'अव्हेंजर्स एंड गेम' या शुक्रवारी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे ॲडव्‍हान्‍स बुकिंग सुरू झाले आहे. चित्रपट समीक्षकांच्‍या माहितीनुसार, अव्हेंजर्स एंडगेम ओपनिंगचे सारे रेकॉर्ड तोडणार आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ॲडव्‍हान्‍स बुकिंगदरम्‍यान, बाहुबली -२, ठग्स ऑफ हिंदोस्तान आणि टायगर जिंदा है यासारख्‍या बड्‍या बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकले आहे.

 
 
सूत्रांच्‍या माहितीनुसार, अव्हेंजर्स एंडगेमचे आतापर्यंत ३५ कोटी रुपयांहून अधिक ॲडव्‍हान्‍स बुकिंग झाले आहे. तर बाहुबली-२ ने ३१.५० कोटी, ठग्स ऑफ हिंदुस्तानने २७.५० कोटी आणि टायगर जिंदा हैने २५ कोटींचे ॲडव्‍हान्‍स बुकिंग केले होते.
 
अव्हेंजर्स एंडगेम ओपनिंगबाबतीत सर्व रेकॉर्ड्स तोडेल, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. ट्रेड पंडितांच्‍यानुसार, सन २०१८ आणि २०१९ मध्‍ये बॉलिवूड चित्रपटांनी चित्रपटगृहात जे ओपनिंग केले आहे, अव्हेंजर्स एंडगेमने सर्वात अधिक ओपनिंग करेल. चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड्‍स तोडणार आहे. अव्हेंजर्स च्‍या या चित्रपटामध्‍ये मार्वेलचे सर्व २२ वेगवेगळ्‍या भूमिका दिसणार आहेत - कॅप्टन अमेरिका, थॉर, आयरन मॅन, ब्लॅक विडो, अँट मॅन वगैरे.
 
अव्हेंजर्स एंड गेम भारतात चार भाषांमध्‍ये २६ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट इंग्लिश, हिंदी, तेलुगु आणि तमिळ भाषामध्‍ये रिलीज केला जाणार आहे.