आजचे राशी भविष्य, दि. २३ एप्रिल २०१९
   दिनांक :23-Apr-2019
 
 

मेष : केलेली कामे पुन्हा एकदा बघा. दबाव किंवा तणाव कमी होऊ शकतो. पैसे गुंतवणूक किंवा घेण्यादेण्याचे योग येऊ शकतात. कोणते तरी काम समोर आणण्याचा विचार करु शकता. संबंधाचा फायदा मिळण्याचा योग आहे. व्यवसायात यश मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतूक करतील. पती पत्नीचे संबध अधिक दृढ होतील.  

वृषभ : कमी मेहनतीत जास्त फायदा मिळू शकतो. काही प्रकरणांत दिवस चांगला असेल. वरिष्ठ तुमच्या कामावर विश्वास दाखवतील. कोणता मोठा निर्णय घ्यायचा असेल तर विश्वासातल्या माणसांचाच सल्ला घ्या. सल्ला उपयोगात येईल. तुमच्या बोलण्याच्या पद्धतीवरुन दुसरे लोक तुमच्या बाजूने येतील. 

मिथुन : मित्र किंवा नातेवाईकांना तुमची कमी जाणवेल. कोणत्या तरी क्षणी चांगल्या ओळखी आणि काही प्रमाणात धन लाभ देखील होऊ शकेल. तुम्ही काही नाती मजबूत करण्याचा प्रयत्न कराल. स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्नही तुम्ही कराल. काही महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण होण्याचा योग आहे. आज सुरू केलेल्या कामांप्रती तुम्ही गंभीर आणि जबाबदार असाल.

कर्क :  पैशांच्या बाबतीत मोठे यश मिळण्याचा योग आहे. त्यासंदर्भातील मोठी संधी तुम्हाला मिळेल. आज तुम्ही त्याचा पूर्ण फायदा उठवाल. कामाचे ठिकाण आणि व्यवसायात नम्रतेने वागण्याने तुम्ही पुढे जाऊ शकता. दुरून कुठूनतरी चांगली बातमी येऊ शकते. तुम्हाला काही जबाबदारीही मिळू शकते. 

सिंह : धन लाभ होण्याचा योग आहे. पैशांशी जोडल्या गेलेल्या प्रकरणात तुमच्या विचारात बदल होऊ शकतो. मेहनतीने धन लाभ होऊ शकतो. लोकांना भेटणे आणि त्यांच्याशी बोलणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. नव्या जबाबदारी मिळण्याचे योग आहेत.

कन्या : अशा काही माणसांशी मुलाखत होईल ज्यांची भविष्यात तुम्हाला मदत होईल. तुम्ही ठरवलेली कामे सहज पूर्ण होतील. आईचं सुख मिळेल. आज नव्या वर्षाची रुपरेखा बनवालं. व्यवसाय वाढू शकतो. जोडीदारासोबत भेट होण्याचे योग आहेत. 

तुळ : ज्यांच्याकडून तुम्हाला कधीच अपेक्षा नव्हती अशी सोबत काम करणारी मंडळी तुम्हाला मदत करतील. सकारात्मक दिशेने पाऊल टाकण्याचा प्रयत्न कराल. पैशांचे कोणतेतरी जुने प्रकरण मार्गी लावण्याचा प्रयत्न कराल. अभ्यासात देखील लक्ष लागेल. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल. संयम ठेवा.

वृश्चिक : कोणते तरी मोठे काम तुम्हाला एकट्यालाच करावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. कोणत्यातरी समस्येचे निराकारण देखील आज होईल. परिवारासोबत वेळ घालवण्याचा आनंद मिळेल.

धनु : संबंधांमध्ये सुधार होऊ शकतात. सर्वांचा आदर ठेवा. तुमच्या निर्णयात स्पष्टपणा असेल. विवाहास योग्य व्यक्तींना विवाहाचे प्रस्ताव मिळतील. नोकरी किंवा व्यवसायांवर बोलणाऱ्यांसाठी चांगली वेळ आहे. जोडीदारासोबत सुरू असलेला तणाव मिटण्याची शक्यता आहे. कोणताही मोठा निर्णय घेताना 

मकर : तुम्ही तुमच्या विचारात थोडा बदल करु शकता. पैसा कमावण्याच्या नव्या संधी समोर येतील. पैशांमुळे तुमची मोठी समस्या सुटण्याचा योग आहे. व्यवसायात मोठा फायदा मिळेल. मित्रांची मदत मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी कराल.

कुंभ : नोकरी किंवा व्यवसायासंदर्भात काही नव्या योजना आखू शकता. आज तुम्ही दुसऱ्यांच्या भावना सहज समजू शकाल. व्यवसायात यश आणण्यासाठी तुम्हाला जोर देऊन काम करण्याची गरज आहे. कामामध्ये सहकाऱ्यांची मदत होईल. कोणती चांगली बातमी मिळण्याचे योग आहेत. नोकरीमध्ये नवे काम मिळण्याचे योग आहेत. कमावण्याचे नवे मार्ग समोर येतील. 

मीन : आज तुमची जबाबदारी वाढेल. नोकरीमध्ये सर्व गोष्टी ठिक ठेवण्यासाठी नेहमीच्या कामापेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करावा लागेल. यामुळे येणाऱ्या दिवसांत तुम्हाला फायदा होऊ शकतो. दुकान किंवा नव्या वाहनाचा फायदा मिळू शकतो. व्यवसायासाठी नव्या लोकांशी संपर्क होतील. वैवाहीक जीवनात आनंद मिळेल.