खडकी हनुमान मंदिराजवळील अतिक्रमण हटले
   दिनांक :23-Apr-2019
 
 
 
वर्धा: नागपूर-तुळजापूर महामार्गाच्या कामात अडसर ठरत असल्याने व्यावसायिकांना दुकाने काढण्यासाठी वारंवार प्रश्नासनाकडून मुदत देत नोटीस बजावण्यात आले. मात्र, सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर तहसील सेलू यांनी शेवटची नोटीस दिली, तरीही अतिक्रमण हटले नाही.
अखेर मंगळवार, २३ रोजी सकाळपासून रस्त्याचे काम रखडल्यामुळे सेलू-िंसदी रेल्वेच्या पोलिस बंदोबस्तासह दंगल पथक यांनी अतिक्रमण काढले. सेलू तालुक्यातील खडकी येथील हनुमान मंदिराजवळील अतिक्रमण कडक पोलिस बंदोबस्तात काढण्यात आले.
 

 
 
खडकीचे हनुमान मंदिर प्रसिद्ध असल्याने मोठ्या प्रमाणात लोक दर्शनाला येत असतात. त्यासाठी लहान-मोठे नाश्ता, चहा, पान यांची दुकानेही येथे थाटली होती. कालांतराने त्याचे पक्क्या बांधकामात रुपांतर झाले. आता तुळजापूर-नागपूर महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असताना अतिक्रमण अडसर ठरत आहे. प्रशासनाने शेवटची नोटीस दिल्यानंतरही अतिक्रमण हटले नाही. अखेर मंगळवार, २३ रोजी सकाळपासून अतिक्रमण काढण्याच्या कामाला सुरुवात झाली. आता लवकरच या भागातही चौपदरीकरणचे काम सुरू केले जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
छायाचित्रात : खडकी येथे अतिक्रमण काढण्याच्या वेळी हजर असलेले दंगल नियंत्रक पथक
फोटो : डब्ल्यू. २३ एप्रिल खडकी जेेेपेजी