किम जोंग करणार रशियाचा दौरा
   दिनांक :23-Apr-2019
- पुतिन यांच्या कार्यालयाची माहिती
सेऊल,
उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन लवकरच रशियाचा दौरा करणार असून, ते या भेटीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेणार आहेत. पुतिन यांच्या कार्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे.
 
 
 
पुतिन यांनीच किम जोंग यांना रशिया भेटीचे निमंत्रण दिले आहे आणि किम जोंग यांनी ते मान्य केले आहे. तथापि, किम यांची रशिया भेट नेमकी केव्हा होणार आहे, याविषयीची अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. उत्तर कोरियातील प्रसारमाध्यमांनीही या वृत्तावर शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान, उच्चस्तरीय सूत्रांच्या मते, याच आठवड्यात ही भेट शक्य असून, रशियाच्या व्लादिव्होस्तोक या शहरात ही भेट होऊ शकते. रशिया आणि उत्तर कोरियाचे संबंध चांगले असल्याने, या भेटीकडे आता अमेरिकेचेही लक्ष लागले आहे.