मतदानात कोल्हापूर अग्रेसर ; ५ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान

    दिनांक :23-Apr-2019
 
 
 
कोल्हापूर:  लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कोल्हापूरमध्ये सकाळपासूनच मतदार बाहेर पडले. एकीकडे पुण्यात मतदानाला थंड प्रतिसाद मिळत असतांना कोल्हापुरात मात्र लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या संख्येने नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. अनेक मतदारसंघात वधु आणि वर लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावत असल्याचे पाहायला मिळाले. तसेच लोकशाही प्रती असणारा हक्क बजवण्यासाठी १०० वर्षाच्या आजीने मतदान केले आहे. या आजीचे नाव सरलाबाई गणपतराव लिंग्रस असे आहे. कोल्हापुरात दुपारपर्यंत ५४.२४ टक्के मतदान झाले आहे. दुसरीकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ४० टक्के मतदान झाले आहे.