आमदार वडेट्टीवारांनी मागितली माफी
   दिनांक :23-Apr-2019
 
 
धानोरकर, धोटेंची मात्र मुजोरी कायम!
 
चंद्रपूर: पोक्सो कायद्यांतर्गत मदतनिधी मिळते म्हणून आदिवासी मुली तक्रार करायला पुढे सरसावत आहेत, असे लज्जास्पद विधान आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासह कॉंगे्रसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे कॉंगे्रसचे उमदेवार बाळू धानोरकर यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केले. त्यावर मंगळवारी संपूर्ण जिल्हा पेटून उठला असून, आदिवासी समाजासह भाजपा आणि अन्य सामाजिक संघटनांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. याची उपरती होताच, आमदार विजय वडेट्टीवार यांनी लगेच मंगळवारी पत्रपरिषद घेऊन, त्यांच्या त्या विधानाची बिनशर्त माफी मागितली. शिवाय, धोटे यांच्या राजीनाम्यासाठी प्रदेशाध्यक्षांकडे मागणीही केली. तरीही सुभाष धोटे यांनी अद्याप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यांची मुजोरी कायमच आहे. बाळू धानोरकर यांनी तर या वक्तव्याची साधी माफीही मागितलेली नाही.