लग्नसोहळ्यात रणवीर सिंह दीपिकाच्या सँडल्स घेऊन फिरला
   दिनांक :23-Apr-2019
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचे एकमेकांवर किती प्रेम आहे सा-या जगाला माहिती आहे. त्यामुळे कधीही कुठेही इतरांनाही त्यांच्या दोघांच्या प्रेमाची प्रचिती ही येतेच. नुकतेच एका विवाहसोहळ्यात रणवीर दिपिकाने हजेरी लावली होती. यावेळी दीपिकाने व्हाईट फ्लोरल रंगाची साडी परिधान केली होती. आणि रणवीरने इंडो- वेस्टर्न ड्रेस परिधान केला होता.

अचानक दीपिकाला साडीत हिल्स असलेल्या सँडलने चालणे अशक्य होत होते. म्हणून खुद्द रणवीरनेच दीपिकाचे सँडल हातात घेऊन फिरताना पाहायला दिसला. जोपर्यंत दीपिकाचे सगळ्या आप्तेष्ठांना भेटून होत नाही तोपर्यंत तो तिचे सँडल सांभाळताना दिसला. रणवीरचा हा क्युट फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.