'या' गोष्टींमुळे होतोय मलायका आणि अर्जुन यांच्या लग्नाला उशीर
   दिनांक :23-Apr-2019
गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवुडचे ट्रेंडिंग कपल मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यावर सा-यांच्या नजरा लागल्या आहेत. मलायका आणि अर्जुन हे एप्रिल महिन्यातच लग्न करणार असल्याच्या चर्चा होत्या. अखेर लग्नाची बातमी ही अफवाच ठरली आहे. तरीही याच वर्षी हे दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. खरंतर अर्जुन कपूर हा सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

 
त्यामुळे यांच्या लग्नाला उशिर होत असल्याचे माहिती समोर येत आहे. 'पानीपत' या सिनेमात अर्जुन झळकणार आहे. लग्नापूर्वी अर्जुनला आपले काम संपवायचे आहे. त्यानंतरच तो लग्नावर आपले लक्ष केंद्रित करणार असल्याचे कारण समोर येत आहे.तसेच आगामी 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' सिनेमा 24 मेला प्रदर्शित होत असून या सिनेमातही तो झळकणार आहे. नुकतेच मलायका हॉस्पीटलमध्ये देखील स्पॉट झाली होती. रिपोर्टनुसार मलायका प्री मॅरिटियल चेकअप करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले होती. याआधी ही मलायका हॉस्पीटलमध्ये गेली होती त्यावेळी तिच्यासोबत अर्जुन देखील होता.
काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये मलायकाने प्रेमाची अप्रत्यक्षपणे कबुली दिली होती. तर या आधी अर्जुन कपूरनेदेखील याच चॅट शोमध्ये अप्रत्यक्षपणे लग्नाचेही संकेत दिलेत. शोचा होस्ट करण जोहरने अर्जुनला त्याच्या रिलेशनशिप स्टेट्सविषयी प्रश्न विचारला. यावर मी सिंगल नाही, असे अर्जुन म्हणाला. अर्जुनच्या या खुलाशाने त्याची बहीण जान्हवी कपूर हिलादेखील आश्चयार्चा धक्का बसला होता.