पुणेकर निघाले मतदानाच्या बाबतीत आळशी! दुपारी १ पर्यंत २७.१७ टक्के मतदान

    दिनांक :23-Apr-2019
 
पुणे : कदाचित मतदानाच्या दिवशीही पुणेकरांना दुपारची झोप आवरणे कठीण झाले आहे, असे चित्र निवडणुकीच्या टक्केवारीवरून दिसून येत आहे. पुण्यात दुपारी १ वाजे पर्यंत राज्यात सर्वात कमी म्हणजेच २७.१७ टक्के मतदान झाले आहे. आज राज्यात १४ मतदारसंघांसाठी मतदान सुरु आहे राज्यात १ वाजेपर्यंत ३५.७० टक्के मतदान झाले आहे. 
 
 

 
 
 
 
इतर मतदार संघात मतदानाची टक्केवारी खालील प्रमाणे आहे. 
 
जळगाव - ३३.१२ 
रावेर - ३५.१५
जालना - ३७.९१
औरंगाबाद - ३५.४२
रायगड - ३८.७४
पुणे - २७.१७
बारामती - ३५.५८
अहमदनगर - ३४.७३
माढा - ३३.४१ 
सांगली - ३४.५६ 
सातारा - ३४.८४ 
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - ३९.९३ 
कोल्हापूर - ४२.०४ 
हातकणंगले- ३९.६८