पैसे मिळत असल्याने लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीत वाढ - वडेट्टीवार यांची मुक्ताफळे
   दिनांक :23-Apr-2019
 
चंद्रपूर : काँग्रेस नेत्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा वसतीगृह लैंगिक अत्याचार प्रकरणी बोलताना असंवेदनशीलता दाखवली आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि संस्थेचे अध्यक्ष सुभाष धोटे यांनी अकलेचे तारे तोडले. पोस्कोमध्ये शासनाकडून ३ लाख आणि ५ लाख मदत मिळते म्हणून अनेक मुली आणि पालक गुन्हा नोंदविण्यासाठी पुढे येत आहेत. हा सुद्धा पब्लिसिटीचा धंदा झाला आहे. पॉस्कोमध्ये मदत मिळणार असल्यामुळे तक्रारकर्त्यांची संख्या वाढली, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसच्या नेत्यांनी केले आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवर यांनीही या प्रकरणी असंवेदनशीलता दाखवली आहे. वडेट्टीवार यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपाचे माजी आमदार अतुल देशकर यांनीही तीव्र शब्दात निषेध नोंदविला.