मुस्लिमांनी मोदींपासून फटकून का वागावे?
   दिनांक :23-Apr-2019
तिसरा डोळा 
 
 चारुदत्त कहू 
 
 
मुस्लिम जगताच्या भारताशी असलेल्या संबंधांमध्ये गेल्या पाच वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणात बदलाव आलेला आहे. भारताच्या विदेश धोरणांमध्ये जे सकारात्मक बदल झाले त्याचाच हा परिणाम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात त्यांनी शेजारी देशांशीच नव्हे तर अनेक विकसित, विकसनशील आणि मागास देशांशीही व्यापारी संबंध मजबूत केले. त्याच साखळीत त्यांनी मुस्लिम जगताशी असलेल्या संबंधांमध्येही सुधारणा केल्या. मुस्लिम लोकसंख्येचा विचार करता पुढील 40 वर्षांत भारत हा सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश होईल. अमेरिकन िंथक टँक प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार इंडोनेशियामध्ये सर्वाधिक म्हणजे 21 कोटी 99 लाख मुस्लिमधर्मीय वास्तव्यास आहेत. मुस्लिम जनसंख्येत भारत दुसर्‍या स्थानावर असून, त्यानंतर पाकिस्तान, बांगलादेश आणि नायजेरियाचा क्रमांक लागतो. सध्या भारतात 19.4 कोटी मुस्लिम लोक राहतात. या पार्श्वभूमीवर सरकारचेच नव्हे तर या देशातील नागरिकांचे त्या देशातील नागरिकांशी देखील सलोख्याचे संबंध आवश्यक आहेत. नुसतेच सलोख्याचे संबंध कामाचे नसून, त्या लोकांचा लोकशाही प्रक्रियेतील सहभाग देखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने मोदी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
 
 
भारताने जगभरात निर्माण केलेला दबदबा आणि मुस्लिम जगताशी सुधारलेल्या संबंधांमुळे यंदा प्रथमच ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशनच्या संयुक्त अरब अमिरातमध्ये पार पडलेल्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेला भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना आमंत्रित करण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या इस्लामिक सुफी कॉन्फरन्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. व्यक्तिशः मोदी यांनी अनेक मुस्लिम देशांचा दौरा करून तेथील अनिवासी भारतीयांवरच नव्हे तर राज्यकर्त्यांवरही आपल्या कामाची आणि भाषणांची मोहिनी घातली.
सध्या देशात निवडणुकीचा ज्वर सुरू आहे. सारेच राजकीय पक्ष आपापल्या परीने निरनिराळ्या समाजांसाठी काय केले, याचा पाढा वाचत आहेत. या मालिकेत तिहेरी तलाक रद्दबातल ठरवण्याचा निर्णय घेऊन मोदी सरकारने मुस्लिम महिलांमध्ये सहानुभूती निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न बर्‍याच अंशी या पक्षासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. ज्या महिलांना या कायद्याच्या अभावी जाच सहन करावा लागला, अशा सार्‍या मुस्लिम महिला एकत्र येऊन सरकारच्या बाजूने मतदान करण्याची शक्यता आहे.
 

 
 
मोदी सरकारने मुस्लिमांसाठी अशा खास योजना आणल्या नसल्या तरी ज्या योजना त्यांनी आखल्या, त्यातून गरीब तबक्यातला सर्व जाती-धर्माच्या लोकांचा फायदा झालेला आहे. उज्ज्वला गॅस योजना, जनधन योजना, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, पंतप्रधान आवास योजना, आयुष्यमान भारत या सार्‍यांचे लाभार्थी सर्वधर्मीय असल्याचा अनुभव आहे. तरी देखील यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा मुस्लिम मतदार भाजपाकडे फिरकणारही नाही, असा दावा केला जात आहे. पण निरनिराळ्या वृत्तवाहिन्यांवरील चर्चा, मुस्लिम अभ्यासकांची मते, यु ट्युबमार्फत कानी पडणारा मतदारांचा कौल हेच सांगत आहे की जेवढे समर्थन मुस्लिम समाजाकडून मोदींना आज मिळत आहे, तेवढे आजवर कुठल्याच पंतप्रधानाला मिळालेले नाही. गेल्या पाच वर्षांच्या काळात ऑर्गनायझेशन ऑफ मुस्लिम कंट्रीजमधील बहुतांश देशांची भारतातील गुंतवणूक वाढली असून, भारतानेही त्या देशांमधील व्यापारी संबंध अधिक बळकट केले आहेत. संयुक्त अरब अमिरातीतील पहिल्या मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच कार्यकाळात झाले. ही गुंतवणूक व्यावसायिक नसली तरी या निमित्ताने धर्म आणि संस्कृतीच्या दृष्टिकोनातून कट्टर असलेला हा देश भारताच्या निकट आला आहे. सीमावर्ती दहशतवादाबाबत अरब जगताने दिलेल्या पािंठब्यामुळेच भारत पाकिस्तानला एकाकी पाडू शकला, ही फार मोठी उपलब्धी आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये नुकताच स्वॅप करन्सीबाबत एक करार झाला आहे. सोबतच उभय देशांनी संरक्षण सज्जता, लष्कर, दहशतवादावर नियंत्रण, व्यापार, ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरातीने भारतात रिफायनरी टाकण्यासाठी 44 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा करार केलेला आहे. या देशांच्या थेट गुंतवणुकीने 10 बिलियन डॉलर्सचा आकडा पार केलेला आहे. भारताची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था पाहता तेलाशिवाय इतर क्षेत्रातही सौदीला उत्पन्नाचा स्रोत दिसू लागलाय्‌. त्यामुळेच त्यांची भारतातली गुंतवणूक वाढली आहे. सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान भारतातील गुंतवणूक वाढवताना पाकिस्तानशी संतुलित संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. मोरोक्को हा आणखी एक मुस्लिम देश असून, या देशासोबत भारताने तंत्रज्ञानाचे आदानप्रदान केले आहे. जगात तिसर्‍या क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियाशी सुद्धा आपले व्यावसायिक संबंध विकसित झाले आहेत. भारतात आर्थिक गुन्हे करून आखाती देशात पळून जाणार्‍यांना वेसण घालण्यात गेल्या साडेचार वर्षात मोठ्या प्रमाणात यश आले आहे. अनेक देशांशी आपण प्रत्यार्पण करार केला असल्याने त्या देशात अशा गुन्हेगारांना अटक झाल्यास त्यांना चौकशीसाठी भारतात आणणे सोपे झाले आहे.
 
इराण भारतासाठी मध्य आशियाचं प्रवेशद्वार आहे. या दोन्ही देशांमध्ये हवाई वाहतूक आणि सांस्कृतिक क्षेत्रात चांगले संबंध आहेत. चाबहार बंदरामुळे उभय देशांमधील व्यापारी संबंध वृिंद्धगत झाले आहेत. पूर्वी दुबई आथिर्र्क गुन्हेगारांसाठी नंदनवन समजले जाई. पण आता ती परिस्थिती बदलली आहे. मोदींच्याच कार्यकाळात अनेक वर्षांनी भारताच्या पंतप्रधानांनी पॅलेस्टाईनला भेट दिली आणि उभय देशांचे आर्थिक संबंध अधिक दृढ झाले. या देशाने तर मोदींना त्यांच्या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले. असेच सर्वोच्च पुरस्कार मोदींना संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाने देखील प्रदान करून, भारत त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा देश आहे, हे जगाला दाखवून दिले. जगातील सर्वात जास्त लोक ख्रिश्र्चन धर्माला मानतात. इस्लाम याबाबत दुसर्‍या क्रमांकावर आहे. कुठलाही धर्म न मानणारे तिसर्‍या क्रमांकावर आहेत. पण अधिकृतरीत्या जगात सर्वाधिक देशांचा धर्म इस्लाम आहे. त्यामुळे मुस्लिम देशांशी जिव्हाळ्याचे संबंध भारतासाठी आवश्यक आहेत. भारताच्या एकूण गरजेच्या 65 टक्के खनिज तेलाचा पुरवठा आखाती देशांतून होतो. या देशात सुमारे 80 लाख भारतीय काम करत असून, त्यांचे उत्पन्न जवळपास 35 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत आहे. त्यामुळे आखाती देश व्यापार, रोजगार, खनिज तेल, सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचे असून त्यांच्याशी अधिक सहकार्याचे धोरण आवश्यक आहे. आज परिस्थिती अशी आहे की परस्परांचे हाडवैरी असलेले अमेरिका आणि रशिया, पॅलेस्टाईन आणि इस्रायल तसेच सौदी अरेबिया आणि इराण हे देश भारताचे मित्र आहेत. गेल्या साडेचार वर्षात भारताने जगातील निरनिराळ्या देशांमध्ये नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीत अडकून पडलेल्या 2 लाख 33 हजार भारतीयांची सुटका केली. सौदी अरेबिया आणि येमेनसोबत असलेल्या मैत्रीमुळेच आपण युद्धजन्य येमेनमधून 5 हजार भारतीय आणि इतर देशांमधील 2 हजार नागरिकांची सुखरूप सुटका करू शकलो. अशी सारी परिस्थिती असतानाही मुस्लिम मतदार मोदींपासून फटकून वागतील, अशा काढण्यात येणार्‍या निष्कर्षामध्ये काय हशील आहे? कॉंग्रेसने कायम मुस्लिमांच्या मनात िंहदूंविषयी द्वेष निर्माण करण्याचाच प्रयत्न केला आहे. आताही कॉंग्रेस आणि इतर सगळे राजकीय पक्ष मुस्लिमांच्या मनात मोदींबाबत भीती निर्माण करण्याचाच उद्योग करीत आहेत. वास्तविक, देश स्वतंत्र होऊनही मुस्लिमांची स्थिती काय आहे आणि यास कोण जबाबदार आहे, हे मुस्लिमांनी जाणून घेतले पाहिजे. ज्यांनी कायम मुस्लिमांकडे मतपेटी म्हणूनच पाहिले, त्यांनी मुस्लिमांचा विकास होऊच दिला नाही. मुस्लिमांनी देशाच्या मुख्य प्रवाहात येऊच नये यासाठी प्रयत्न केलेत. त्यामुळे या सगळ्या बाबींचा गांभीर्याने विचार करून मुस्लिम बांधवांनी मतदान करायला हवे.
9922946774