अंबानींच्या व्यवसायावर सौदी अरबमधील कंपनीचीही नजर
   दिनांक :24-Apr-2019
सौदी अरबमधील आरामको या कंपनीमधील रिलायन्स क्षेत्रातील रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल व्यवसायातील 25 टक्के भागीदारी खरेदी करणार असल्याची माहिती आहे. हा व्यवहार 10 ते 15 अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
 
 
 
सौदी अरबमधील सगळ्यात मोठी तेल निर्यात कंपनी आरामको मागील चार महिन्यांपासून रिलायन्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहे. या व्यवहारासाठी सौदी अरबचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी मुकेश अंबानी यांचीही भेट घेतल्याची माहिती आहे.