बार्सिलोना ला लीगा जेतेपदाच्या समीप

    दिनांक :24-Apr-2019
व्हिक्टोरिया, 
बार्सिलोनाने डिपोर्टिव्ह ॲलाव्हिस संघावर सरळ 2-0 ने विजय नोंदविला असून ते ला लीगा फुटबॉल विजेतेपदाच्या समीप पोहोचले आहे. बार्सिलोना 12 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर असून त्यांना अजून चार सामने खेळावयाचे आहे. यासामन्यात 54 व्या मिनिटाला कार्लेस ॲलेनाने पहिला गोल नोंदविला, तर लुईस सुआरेजने पेनॉल्टीवर दुसर्‍या गोलची भर घातली. 

 
 
दुसर्‍या स्थानावरील ॲटलेटिको माद्रिद जर उद्या व्हॅलेन्सियाकडून आणि शनिवारी रियाल व्हॅलाडोलिड संघाकडून पराभूत झाला, तर बार्सिलोनाचे विजेतेपद सुनिश्चित होईल. तत्पूर्वी बार्सिलोना संघ लेव्हॅन्टी संघाविरुद्ध खेळणार आहे. पुढील आठवड्यात होणार्‍या चॅम्पियन्स लीग उपांत्य फेरीतील लिव्हरपूलविरुद्धचा सामना लक्षात घेऊन प्रशिक्षक अर्नेस्टो व्हॉल्व्हर्ड हे लेव्हॅन्टी संघाविरुद्धच्या सामन्यासाठी मेस्सी, जॉर्डी अल्बा व आर्थर यांना विश्रांती देण्याची शक्यता आहे.