निर्माणाधीन रस्त्यावरून दोन गटात वाद
   दिनांक :24-Apr-2019
- परस्पर तक्रारीवरून 28 जणांविरूध्द गुन्हे दाखल 
 
 
कारंजा लाड, 
येथील निर्माणाधिन रस्त्यावरून वाद झाल्याने परस्परविरोधी तक्रारीवरून 28 जणांविरूध्द कारंजा शहर पोलिसांनी 23 एप्रिल रोजी रात्री उशिरा विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.
 
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कारंजा शहरातील गवळीपुरा भागात स्थानिक नप प्रशासनाच्या वतीने एका सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम सुरू आहे. सदर रस्त्याच्या कामावरून दोन गटात वाद झाला व वादाचे पर्यावसान हाणामारीत झाल्याने परस्परविरोधी तक्रारीवरून 28 जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले. फिर्यादी जमील छटु शेकुवाले रा. गवळीपुरा कारंजा यांच्या फिर्यादीवरून 12 जणांविरूध्द तर रफिक खैरू शेकुवाले रा. गवळीपुरा कारंजा यांच्या फिर्यादीवरून 16 जणांविरूध्द भादंविच्या कमल 307, 147, 148, 149, 323 व 324 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, सदर प्रकरणाचा अधिक तपास कारंजा शहर पो स्टे चे ठाणेदार सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनात सहायक पेालिस निरीक्षक लिलाधर तसरे व पोलिस उपनिरीक्षक योगेश धोत्रे करीत आहे.