आशियाई कुस्ती अजिंक्‍यपद स्पर्धा: अमित धनखडला रौप्यपदक

    दिनांक :24-Apr-2019
जियाम,
येथे सुरु असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्‍यपद स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी भारताचा मल्ल अमित धनखड याने 14 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकाविले आहे. अमित धनखड याला अंतिम फेरीच्या सामन्यात कजाकिस्तानचा मल्ल दैनियार कैसानोव याने 0-5 ने पराभूत केले.
 

 
भारताने या स्पर्धेत आतापर्यंत 6 पदक जिंकले आहेत. आशियाई कुस्ती अजिंक्‍यपद स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बजरंग पुनियाने 65 किलो वजनी गटात सुवर्ण, प्रवीण राणाने 79 किलो वजनी गटात रौप्यपदक आणि सत्यव्रत कादियान याने 97 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकाविले होते.